यावर्षी 8 सप्टेंबर अक्षय कुमारच्या आईचं निधन झालं. अक्षयने नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये तो आईच्या आठवणीत भावूक झाला आहे. याला कॅप्शन देताना तो म्हणतो, ‘मला आज माझ्या आईची खूप आठवण येतेय.’ यावेळी त्याच्या चेह-यावर दु:खाचे भाव दिसून येत आहेत.
या व्हिडीओतील त्याचा हा लूक आगामी चित्रपट ‘रामसेतू’साठी करण्यात आला आहे. ती माझा गाभा होती आणि आज मला तिच्या जाण्याने अंतःकरणात असह्य वेदना होत आहेत. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे आणि ती माझ्या वडिलांकडे दुसऱ्या जगात गेली आहे. या कठीण काळात माझ्या कुटुंबासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांना आदर करतो. ओम शांती हे कॅप्शन देत अक्षयने त्याच्या आईच्या निधनाची बातमी चाहत्यांशी शेअर केली होती.