By  
on  

तेलगू कोरिओग्राफर शिवा शंकर याचं करोनामुळे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

तेलगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर शिवा शंकर यांनी करोनामुळे घेतला अखेरचा श्वास. हैदराबादमधील रुग्णालयात ते करोनाशी झुंज देत होते. ते 72 वर्षांचे होते. तसंच त्यांच्या मुलालासुध्दा करोनाची लागण झाली असून त्याच्यावर सुरु असल्याची माहिती आहे. शिवा शंकर यांच्या निधनाने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. 

शिवा शंकर यांच्या निधनानंतर सोनू सूदने एक ट्वीट करत भावना व्यक्त केल्या आहेत. “शिवाशंकर मास्टरजींच्या निधनाची बातमी ऐकून मन हेलावून गेलंय. त्यांना वाचवण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला पण देवाची इच्छा वेगळीच होती. मास्टरजी तुम्ही कायम स्मरणात रहाल. त्यांच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देव देवो.” अशा आशयाची पोस्ट सोनूने शेअर केली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive