By  
on  

बिग बॉस 15 च्या विजेतेपदावर तेजस्वी प्रकाशने कोरलं नाव

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शो . हिंदीतल्या बिग बॉसचं यंदाचा हा 15 वा सीझन. अनेक कारणांनी हा सीझन गाजला. जंगल थीमने सुरु झालेला हा रंगतदार शो वाईल्ड कार्ड एन्ट्रीजच्या ट्विस्टमुळे आणखी रंगतदार झाला. स्पर्धक कलाकारांनी फिनालेमध्ये पोहचण्यासाठी अटीतटीची लढत दिली. यंदाच्या १५ व्या पर्वातील बिग बॉस हिंदीचा विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांच् लक्ष लागले होते. अखेर रविवारी बिग बॉस हिंदीच्या १५ व्या सीझनच्या विजेत्याची घोषणा झाली. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही यंदाच्या बिग बॉस हिंदीच्या १५ व्या सीझनची विजेती ठरली. तेजस्वीला बिग बॉसची ट्रॉफी आणि ४० लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive