By  
on  

‘रंगीला’ला बद्दल खंत व्यक्त करत उर्मिला म्हणते, 'एक पुरस्कारसुध्दा.....'

अभिनेत्री उर्मिला मांतोडकर हिने बॉलिवूडमध्ये खास असं आपलं स्थान निर्माण केलं. निवडक सिनेमांमधून तिने आपली छाप सोडली. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी उर्मिला आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली.  ‘मासूम’ हा तिचा पहिला सिनेमा. पण तिला खरी ओळख ‘रंगीला’ चित्रपटातून मिळाली. पण नुकतंच एका मुलाखतीत उर्मिलाने या चित्रपटाबाबत खंत व्यक्त केली आहे. 

एका मुलाखतीदरम्यान उर्मिलाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. उर्मिला सांगते, मी एका सामान्य कुटुंबातून आले आहे. सिनेसृष्टीशी ामचा काहीच संबंध नव्हता. मला इथे टिकण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला. माझ्याकडे प्रसिध्द आडनाव नव्हते, तेव्हाचा मिडीया खुप काही वाईट माझ्याबद्दल छापायचा. माझे फोटो निर्मात्यांना दाखविण्यासाठी मी कधीच घेऊन गेले नाही. माझ्याबद्दल सर्वांचंच वाईट मत होतं. हे सर्व चार वर्ष सुरु होतं. अखेर रंगीला आला आणि सगळं शांत झालं. 

उर्मिला पुढे सांगते,   “पण रंगीला या चित्रपटाबद्दल मला अजूनही एका गोष्टीची खंत वाटते. ‘रंगीला’ चित्रपटातील अभिनयाचे कोणतेही श्रेय तिला दिले गेले नाही. या चित्रपटात मी जे काही काम केले त्याला लोक फक्त सेक्स अपील म्हणत होते. तिचा अभिनयाशी काहीही संबंध नाही, रंगीला खुप सुपरहीट झाला. सिनेमाचं भरपूर कौतुक झालं परंतु माझ्याबद्दल एक चांगला शब्द आला नाही. पुरस्कार सोडा पण माझ्या लुकचंसुध्दा कौतुक झालं नाही. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive