By  
on  

श्रध्दा कपूर आणि लतादीदींमध्ये आहे हे खास नातं

भारतरत्न लता मंगेशकर आपल्यातून निघून गेल्या. लता दीदी अनंतात विलीन झाल्या आहेत.  पण त्यांनी गायलेल्या सुरेल गाण्याच्या रूपाने लतादिदी कायम आपल्यात राहतील. त्यांच्या निधनाने कायमची एक पोकळी आज निर्माण झाली आहे. लता दीदींना शासकीय इतामामात मानवंदना देण्यात आली. अंत्यसंस्कारही करण्यात आले.  मोठ्या जड अंत:करणाने दीदींना चाहत्यांनी अखेरचा निरोप दिला. त्यांचा सुरेल स्वर अजरामर राहील, हे मात्र नक्की.

 लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून  उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे.त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणं आढळून आल्याने व निमोनिया झाल्यामुळे  आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. अवघा देश दीदींच्या जाण्याने शोकसागरात बुडाला आहे.

शनिवारी जेव्हा दीदींची प्रकृती खालावली तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री श्रध्दा कपूर व तिची आई शिवांगी कपूर यांनीही भेट घेतली होती. तसंच रविवारी अंत्यसंस्काराच्यावेळीसुध्दा श्रध्दा शिवाजी पार्कवर मंगेशकर कुटुंबियांसोबत बसली होती.  श्रध्दाचं  ‘रॉक ऑन २’ सिनेमातील गाण्याचं प्रचंड कौतुक झालं होतं. त्यावेळेस ती म्हणाली होती, माझी आई शिवांगी यांचे वडील पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे एक प्रसिद्ध गायक आणि वीणावादक होते. त्यांच्याकडे श्रद्धाने काही वर्ष गाण्याची शिकवणीही घेतली होती. श्रद्धा म्हणाली की, माझ्या घरामध्येच गाण्याचे संस्कार आहेत. माझे आजोबा पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे स्वतः उत्तम गायक होते आणि लता मंगेशकर या माझ्या मावशी आजी आहेत. त्यामुळे गायन हे तर माझ्या कुटुंबाच्या नसानसात भरलेलं आहे

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive