By  
on  

महाभारतात भीमची भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचं निधन

अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचे निधन झाले आहे. बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत भीम ही व्यक्तिरेखा साकारल्याने ते घराघरांत पोहचले होते. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तसेच त्यांच्यावर आर्थिक संकटही कोसळले होते. प्रवीण यांच्या निधनानंतर कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. 

प्रवीण यांनी आजवर अनेक बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेने त्यांना खरी ओळख मिळवून दिली होती. या मालिकेतील त्यांची भीम ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive