By  
on  

ब-याच वर्षानंतर परेश रावल यांचं गुजराती सिनेमात पुनरागमन, पाहा 'डियर फादर'चा ट्रेलर

बॉलिवूडचे चतुरस्त्र अभिनेते परेश रावल यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने नेहमीच रसिकांची मनं जिंकली आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत असंख्य सिनेमांमधून विविध व्यक्तिरेखा साकारत आपली छाप पाडली आहे. परेश रावल या नावाभोवतीच एक मोठं वलय आहे. गुजराती भाषिक असलेल्या परेश रावल हे गुजराती रंगभूमी नेहमीच गाजवतात. पण आता ब-याच वर्षानंतर ते गुजराती सिनेमामंध्ये दमदार पुनरागमन करतायत. परेश रावल यांची प्रमुख भूमिका असलेला डियर फादर हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. 

डियर फादर हा सिनेमा गुजराती नाटकावर आारित आहे. स्सपेन्स आणि थ्रीलने भरपूर असा हा सिनेमा आहे. यात अभिनेते परेश रावल दुहेरी भूमिकेत पाहायला मिळतील. या सिनेमात एक मर्डर मिस्ट्रीचा गुंता सोडवण्यात येणार आहे. परेश रावल यांनी साकारलेल्या या भूमिकांमुळे सिनेमा पाहणं प्रचंड रंजक होणार आहे. 

डियर फादर या सिनेमात परेश रावल यांच्यासोबतच चेतन डी आणि मानसी पारेख हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. तर उमेश व्यास यांनी या सस्पेन्स थ्रीलर सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या 4 मार्च 2022 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive