By  
on  

जाणून घ्या, डिस्को किंग बप्पी लहरींना सोन्याची एवढी आवड का?

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचं आज निधन झालं. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा घेतला. बप्पीदांमुळेच भारतीय संगीताला डिस्को गाण्यांची ओळख झाली व नवचैतन्य पसरलं. आता त्यांच्या निधनाने  संपूर्ण कालविश्वालर शोककळा पसरलीय. बप्पी दांनी सिनेसृष्टीत त्यांच्या गाण्यासोबतच स्वत:ची एक छान ओळखही निर्माण केली होती. सोन्याने मढलेले बप्पी दा प्रत्येक कार्यक्रमाची शोभा आणखी वाढवायचे. त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची त्यांच्या सुरेल संगीताप्रमाणेच नेहमी चर्चा व्हायची. 

कुठल्याही  कार्यक्रमात असो, गाण्याचं रेकॉर्डिंग किंवा मग घरी बप्पी दा हे नेहमीच सोन्याने मढलेले असायचे. ते इतंकं सोनं नेहमी का परिधान करायचे याविषयी सामान्यांप्रमाणेच सेलिब्रटींनासुध्दा उत्सुकता असायची. बप्पी लहिरींनी त्यांच्या गाण्यांनी अनेकांची मने तर जिंकलीच पण त्याचसोबत त्यांचे सोन्यावरील प्रेम हे देखील सर्वांसाठी कुतुहलाचा विषय ठरायचा.त्यांच्याकडे गणपती, कृष्णा, बालाजी या देवतांचे लॉकेट असलेल्या चैन होत्या.
 

याच सोन्यावरील प्रेमाबद्दल एका मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलं होतं. तुम्ही एवढे सोन्याचे दागिने का घालता? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला तेव्हा त्यांनी याबद्दल खुलासा केलेला. यावर उत्तर देताना ते म्हणाले होते, “हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता एल्विस प्रेसली हा माझा आवडता कलाकार असून तो कायम गळ्यात सोनसाखळी घालतो. त्याला पाहून मला कायम प्रेरणा मिळत राहिली. इतकंच नाही तर, जर मी जीवनात यशस्वी झालो तर माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करेन असं ठरवलं होतं. त्यातच मला असं वाटतं की सोनं माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळेच मी कायम सोन्याचे दागिने घालतो.” इतकच नाही तर पुढे बोलताना बप्पीदांनी, “गाण्यासोबत माझी वेगळी ओळखही झाली आहे,” असंही सांगितलं होतं.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive