By  
on  

'डिस्को किंग' बप्पीदांचं शेवटपर्यंत दिसलं सोन्यावरचं प्रेम, वाचा सविस्तर

सुप्रसिध्द गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 69 वर्षांचे होते. डॉक्टरांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “बप्पी लहरी मागील महिनाभरापासून रुग्णालयात उपचार घेत होते. आपल्या जबरदस्त आवाजाबरोबरच गोल्डमॅन म्हणून ओळखल्या जाणा-या बप्पी लहरींच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. 

कुठल्याही  कार्यक्रमात असो, गाण्याचं रेकॉर्डिंग किंवा मग घरी बप्पी दा हे नेहमीच सोन्याने मढलेले असायचे. ते इतंकं सोनं नेहमी का परिधान करायचे याविषयी सामान्यांप्रमाणेच सेलिब्रटींनासुध्दा उत्सुकता असायची. बप्पी लहिरींनी त्यांच्या गाण्यांनी अनेकांची मने तर जिंकलीच पण त्याचसोबत त्यांचे सोन्यावरील प्रेम हे देखील सर्वांसाठी कुतुहलाचा विषय ठरायचा. आपल्या सुरेल संगीताप्रमाणेच सोन्यासोबतची त्यांची अनोखी स्टाईल प्रसिध्द होती. 

शेवटपर्यंत बप्पीदांचं सोन्यावरचं प्रेम दिसून आलं. निधनाच्या तीन दिवसांआधी पोस्ट केलेल्या त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्येही गोल्डचा उल्लेख होता. मात्र हा उल्लेख दागिण्यांसंदर्भात नव्हता. याच पोस्टवर आता चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहेत.

 

बप्पीदांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन १३ फेब्रुवारी रोजी एक जुना फोटो पोस्ट करण्यात आलेला. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी जुनं ते सोनं असं म्हटलं होतं. याच पोस्टवर आता त्यांचे अनेक चाहते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना कमेंट सेक्शनमध्ये दिसत आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive