By  
on  

मधुर भांडारकर दिग्दर्शित 'बबली बाऊन्सर' चा श्रीगणेणा, तमन्ना भाटिया प्रमुख भूमिकेत

महिलांना केंद्रस्थानी ठेऊन बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सिनेमे देणार दिग्दर्शक अशी मधुर भांडारकर यांची ख्याती आहे. त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता असते. तसंच त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अनेक कलाकार हे उत्सुक असतात. आता  ही संधी प्रसिद्द अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला मिळाली आहे. मधुर भांडारकर यांच्या आगामी बबली बाऊन्सर या सिनेमात तमन्ना प्रमुख भूमिकेत झळकतेय. 18 फेब्रुवारी शुक्रवारपासून या सिनेमाच्या शूटींगचा श्रीगणेशा करण्यात आला. पहिला क्लॅप देतानाच मधुर भांडारकर यांचा तमन्नासोबतचा बबली बाऊन्सरच्या सेटवरुन फोटो व्हायरल होत आहे. 

 

 

मधुर भांडारकर बबली बाऊन्सरची घोषणा करताना लिहतात, माझा हा 15 वा सिनेमा. सांगण्यासाऱखी अजून एक अनोखी कथा. कधीही न अनुभवलेल्या बाऊन्सरच्या जगात तुमचं स्वागत आहे. एक धम्माल, विनोदी आणि हदयस्पर्शी कथा. तमन्ना भाटियाला या सिनेमात पाहा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive