By  
on  

चिन्यांनाही पडली 'चिट्टी'ची भुरळ, 2.0 चीनमध्ये प्रदर्शित होणार

दक्षिणी चित्रपटाचा बेताज बादशहा रजनीकांत यांचं फॅन फॉलोइंग केवळ देशातच नाही तर देशाबाहेरही आहे. त्यामुळेच की काय आता चिन्यांनाही रजनीकांतच्या अभिनयाची भुरळ पडली आहे. रजनीकांत आणि अक्षय कुमार  2.0 हा देशातला सर्वात महागडा सिनेमा आहे.

यापूर्वी आलेल्या रोबोट या सिनेमातील चिट्टी ही मध्यवर्ती भूमिका राजनीकांत यांनी 2.0 मध्ये अधिक प्रभावी पद्धतीने साकारली आहे. भारतात प्रदर्शित होणारा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे.या चित्रपटाचं बजेट जवळपास पाचशे कोटींचं आहे. उत्तम तंत्रज्ञान, अक्षय कुमार, अॅमी जॅक्सन, यांच्या भूमिका देखील या सिनेमाची जमेची बाब आहे.

2.0 हा शंकर दिग्दर्शित सिनेमा चीनमध्ये पुढील वर्षी प्रदर्शित होईल. भारतात आतापर्यंत या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी चीनमध्ये कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या चित्रपटाने जगभरात आतापर्यंत 400 कोटींची कमाई केली आहे. आता चीनमध्ये असेच कमाईचे उच्चांक मोडले जातात का ते लवकरच समजेल.

Recommended

PeepingMoon Exclusive