By  
on  

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनची कॉफी डेट, काय म्हणाला कार्तिक

सध्या बॉलीवूडला सारा अली खानच्या पहिल्या वहिल्या सिनेमाचे वेध लागले आहेत. साराही ‘केदारनाथच्या’ प्रमोशनमध्ये कोणतीही कसर बाकी ठेवताना दिसून येत नाही. अनेक प्रमोशन प्लाटफोर्मवर तिची आवर्जून हजेरी दिसून येत आहे. तर दुसरीकडे तिच्या 'सिंबा'तील लूक्सचंही प्रचंड कौतुक होताना दिसून येतेय. याशिवाय सैफ, अमृता,  सोहा अशी सगळी घरची मंडळी देखील साराच्या डेब्युचं जमेल तिथं प्रमोशन करताना दिसत आहेत. सारासोबत  केदारनाथ या सिनेमात सुशांतसिंग राजपूत तर सिंबामध्ये रणवीर सिंह नायक आहे.

साराने मध्यंतरी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजरी लावली होती. विशेष म्हणजे यावेळी लाडक्या लेकीसोबत सैफनेही या शोमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी करणच्या अनेक आडून आडून विचारल्या जाणार्‍या प्रश्नांना सारानेही दिलखुलासपणे उत्तरं दिली होती. करणच्या ‘तुला कुणाशी लग्न करायला आवडेल’ या प्रश्नावर तिने रणबीर कपूरचं नाव घेतलं होतं. पण ‘कुणाला डेट करायला आवडेल’ याचं उत्तर मात्र कार्तिक आर्यन असं दिलं होतं. साराच्या या उत्तरावरून कार्तिकला छेडलं असता त्यानेही ‘ सारासोबत कॉफी प्यायला मलाही आवडेल’ असं विधान केलं होतं. त्यामुळे कार्तिक आणि सारा बॉलिवूडमधील नवं कपल असणार की काय याची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

अलीकडेच एका रेडियो शोमध्ये हजेरी लावलेल्या साराला याविषयी विचारण्यात आलं तेव्हा तिने कार्तिकला डेट करण्याच्या इच्छेचा पुनरुच्चार केला. याशिवाय कार्तिकला तिच्या घरचा पत्ता देण्याची गळ आरजेला घातली. यावर उत्तर देताना कार्तिकने देखील साराच्या घरचा पत्ता मिळण्याची वाट बघत असल्याचं नमूद केलं आहे. आता या दोघांच्या डेटिंगचा प्लान प्रत्यक्षात उतरतोय की काय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे .

Recommended

PeepingMoon Exclusive