By  
on  

मिकाच्या कृत्यांचा डंका परदेशातही वाजला, भारतीय दुतावासाने केली सुटका

मिका सिंग कधी गाण्यामुळे तर कधी कारनाम्यामुळे कायमच चर्चेत असतो. मिका सिंगचे कारनामे केवळ भारतातच नाही तर सातसमुद्रापारही वाईट पद्धतीने गाजत आहेत. अलीकडेच मिकाला दुबई पोलिसांनी लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक केली होती. अशा वेळी त्याची भारतीय दुतावासाच्या मदतीने सुटका केली गेली. रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी त्याची सुटका झाली.

एका कार्यक्रमादरम्यान ब्राझीलच्या एका मुलीने मिकावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. मिकाने या मुलीला अश्लील चित्र पाठवून लैंगिक छ्ळ केल्याचा आरोप संबंधित मुलीने मिकावर केला होता. या  तक्रारीवरून दुबई पोलिसांनी मिकाला अटक केली होती. परक्या देशात अडचणीत सापडलेल्या मिकाने सुटकेसाठी भारतीय दुतावासाकडे मदतीची मागणी केली होती. मिकाची तुरुंगातून सुटका झाली असली तरी या गुन्ह्यातील कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive