By  
on  

शाहरुखची थेट अंतराळात झेप, बायोपिकमध्ये करणार काम

सगळ्या भारतीयांसाठी गौरवास्पद असलेली बाब म्हणजे एका भारतीयाची पहिली अंतराळ सफर. भारताकडून पहिल्यांदा अवकाशात जाण्याचा मान मिळाला होता, रिटायर्ड एअरफोर्स विंग कमांडर राकेश शर्मा यांना. हा गौरवास्पद आता पडद्यावर दिसणार आहे. राकेश शर्मा यांच्यावरील बायोपिकने हे साध्य होणार आहे. यातील मुख्य भूमिका साकारणार आहे बादशहा शाहरुख खान.

या बायोपिकचं नाव ‘सारे जहां से अच्छा’ असं असणार आहे. या बायोपिकला महेश मथाई दिग्दर्शित करणार आहेत. झिरोचं चित्रिकरण संपल्यानंतर शाहरुख या चित्रपटाच्या शुटिंगकडे वळेल असं बोललं जात आहे. खरं तर या चित्रपटाचं या आधीचं नाव ‘सॅल्युट’ असं होतं. पण ते बदलून ‘सारे जहां से अच्छा’ असं करण्यात आलं.
या चित्रपटाच्या शुटिंगला पुढील वर्षी सुरुवात होईल. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रुवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर करत आहेत

Recommended

PeepingMoon Exclusive