आयुष्यात आलेल्या संकटामधून तुम्ही कशाप्रकारे बाहेर येता हे महत्त्वाचं असतं. अशीच एक ‘हिलींग स्टोरी’ सांगत आहे मनीषा कोईराला.
अभिनयात ओळख बनवल्यानंतर अभिनेत्री मनीषा कोईरालाने लेखिका म्हणून नवी इनिंग सुरु केली आहे. तिने ‘हिल्ड’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात तिने कॅन्सरला दिलेल्या यशस्वी लढ्याची गोष्ट आहे. याकामी मनीषाला लेखक नीलम शर्मा यांची मदत झाली आहे. खरंतर मनीषा तिच्या आयुष्यावर पुस्तक लिहीत असल्याचं सुत्रांकडून समजलं होतंच पण नुकतंच तिने पुस्तकाची पहिली झलक सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
मनीषाला काही वर्षांपूर्वी ओव्हरीयन कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. त्यावर मात करत तिने नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. कॅन्सरचं निदान झाल्यापासून ते कॅन्सरमुक्तीपर्यंतचा प्रवास तिने या पुस्तकात सांगितला आहे. याचं उपशीर्षक ‘कॅन्सरने मला दिलेलं नवजीवन’ असं आहे. मनीषा आपल्या पुस्तकाबद्दल खुपच उत्साहित दिसून आली. पुस्तक लिहिण्याच्या व्यस्त वेळापत्राकतूनही ती ‘प्रस्थानम’ या आगामी चित्रपटात संजय दत्त सोबत झळकणार आहे.