By  
on  

आता बॉलिवूडकरांमध्ये लगीनघाई ‘या’ ग्रँड वेडिंगची

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन आहे की काय असं वाटण्याजोगं वातावरण आहे. सगळ्यात आधी दीपवीरच्या लग्नाचा बार उडला. त्यानंतर प्रियांका वधूवेषात सजली. या दोन सौंदर्यवतींचे कौतुकसोहळे संपतात न संपतात तोच आणखी एका लग्नाची सनई वाजू लागली आहे.

हे लग्न आहे ईशा अंबानीचं. अर्थात या लग्नाचा बॉलिवूडशी अर्थाअर्थी संबंध नसला तरी निम्म्यापेक्षा जास्त व-हाडी हे बॉलिवूड्करच आहेत. ईशाच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनसाठी सेलिब्रिटी उदयपूरमध्ये जमण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे. त्यामध्ये अनिल कपूर पत्नी सुनीतासह, दिग्दर्शक डेव्हिड धवन, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा हे उदयपूरला पोहोचले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1071313927039053824

अंबानी आणि पिरामल कुटुंबियांनी नव्या जोड्प्याला आशिर्वाद मिळत रहावेत यासाठी अन्नदानाचा संकल्प केला आहे. ही अन्नसेवा जयपूरमध्ये ७ ते १० डिसेंबर दरम्यान पार पडत आहे.

https://twitter.com/ANI/status/1071317890849230848

ईशा अंबानी आणि आनंद पिरामीलचा लग्न सोहळा १२ डिसेंबरला उद्यपुरमध्ये होत आहे. लग्नाआधीच्या कार्यक्रमांसाठी अंबानी कुटुंब उदयपूरमध्ये दाखल झालं आहे. तसंच बॉलिवूडकर व-हाडी मंडळींचीसुध्दा मांदियाळी जमू लागली आहे.अभिनेता अनिल कपूर, पत्नी सुनिता, तसंच दिग्दर्शक डेव्हिड धवन,रवीना टंडन, सलमान खान, जॉन अब्राहम, विद्या बालन आणि फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा  यांसह अनेक सेलिब्रिटी उदयपूरमध्ये पोहोचले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive