By  
on  

सलमान खान लॉंच करत असलेल्या प्रनुतन बहलच्या सिनेमाचा फस्ट लूक रिलीज

सलमान खानला चित्रपटसृष्टीत गॉडफादर म्हणूनच ओळखलं जातं. कतरिना कैफ, डेझी शाह, जॅकलीन ही त्यातील काही ओळखीची नावं. एखाद्याला यशोशिखरावर नेण्याची जबाबदारी सलमानने घेतली तर तो ती पूर्ण करूनच सोडतो हे सगळ्या बॉलिवूडला ठावूक आहे.
आताही अशीच एक जबाबदारी सलमानने शिरावर घेतली आहे. सलमान जवळच्या मित्राच्या मुलाला म्हणजेच जहीर इक्बाल आणि मोहनीश बहल याची मुलगी प्रनुतन हिला होम प्रॉडक्शनच्या पुढील चित्रपटामधून लाँच करत आहे.
‘नोटबूक’ असं या सलमानच्या होम प्रॉडक्शनच्या या चित्रपटाचं नाव आहे. नितीन कक्कर हे या चित्रपटाचे दिग्ददर्शक आहेत. २९ मार्चला रिलिज होणा-या या सिनेमाचा फर्स्ट लूक आज रिलिज झाला. सिनेसमीक्षक तरन आदर्श यांनी ट्वीट करून ही बातमी शेअर केली आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/1072008731351633920

या फर्स्ट लूकमध्ये जहीर आणि प्रनुतन एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या कपल सारखे दिसत आहेत. या दोघांपैकी जहीरला सिनेपार्श्वभूमी नाही तर प्रनुतनच्या मागे आजी नुतन, वडिल मोहनीश, आत्या काजोल अशी दर्जेदार कलाकारांची पार्श्वभूमी आहे. प्रनुतनच्या लूकची तुलना आतापासूनच नुतन शी केली जात आहे. त्यामुळे हा प्रवास तिच्यासाठी नक्कीच सोपा नसेल.

Recommended

PeepingMoon Exclusive