By  
on  

जाणून घ्या अमिताभ बच्चन काय म्हणाले दिलीप कुमार यांच्याबद्दल

'ट्रॅजेडी किंग’ असं बिरुद मिरवणा-या दिलीप कुमार यांनी आज ११ डिसेँबरला वयाच्या ९६व्या वर्षांत पदार्पण केलं. या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही दिलीप कुमार यांच्यासाठी भावनिक पोस्ट लिहित भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

ट्विटर वर भावनिक संदेश लिहून अमिताभ बच्चन यांनी द ग्रेट दिलीप कुमार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांनी दिलीप कुमारांना ‘कलेचा जादूगार’ म्हणून संबोधलं आहे. याशिवाय भारतीय सिनेमाला त्यांनी दिलेल्या योगदानाबद्द्ल आभारही मानले आहेत.

अमिताभ बच्चन म्हणतात, ‘दिलीप कुमार ख-या अर्थाने कलेचे जादूगार आहेत. त्यांना उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो. भारतीय सिनेसृष्टीला त्यांनी दिलेलं योगदान अनमोल आहे.’


अमिताभ आणि दिलीप कुमार यांनी एकत्रितपणे ‘शक्ती’ या चित्रपटात काम केलं आहे.

दिलीप कुमार यांच्या तब्ब्येतीमधील चढ उतार हे चाहत्यांसाठी चिंतेचं कारण बनत असतात. पण सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या वाढदिवसाचं सेलिब्रेशन दिलीप कुमार यांच्या घरी अगदी जवळच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत साधेपणानं झालं.
पेशावरमध्ये जन्मलेल्या दिलीप कुमार यांनी मधुमती, देवदास, शक्ती, सौदागर, बाबूल या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. ‘किला’ हा त्यांच्या कारकिर्दीमधील शेवटचा सिनेमा होता.

https://twitter.com/SrBachchan/status/1072357059440640002

Recommended

PeepingMoon Exclusive