By  
on  

अ‍ॅनिव्हर्सरी स्पेशल: विराट काय म्हणतो,अनुष्काबद्दल

अनुष्का-विराट कोहलीचं लग्न म्हणजे जणू परीकथाच होती. पण या परीकथेला आज एक वर्षं पूर्ण झालं आहे. गेल्या वर्षी याच दिवशी इटलीतील टस्कनी इथे या दोघांनी एकमेकांना आयुष्यभर सोबत करण्याचं वचन दिलं होतं. लग्नाच्या वर्षपूर्ती निमित्ताने विराटने फॅन्ससाठी लग्नाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. विराटने आठवणींना उजाळा देत लग्नातील काही महत्त्वाचे फोटोही शेअर केले आहेत.

हे फोटो पोस्ट करताना विराट म्हणतो, ‘एक वर्ष निघून गेलं समजलंच नाही. सगळं जणू कालच घडून गेल्यासारखं वाटत आहे. सगळ्यात जवळची मैत्रिण आणि सोलमेट अनुष्काला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ विराट आणि अनुष्काने अत्यंत खासगी समारंभात लग्नाच्या आणाभाका घेतल्या होता. तेव्हापासून अनेकदा ही जोडी चर्चेत असते.

अनुष्कानेही सोशल मिडिया अकाउंटवर एका व्हिडिओ पोस्ट करुन विराटसाठी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लग्नातील महत्त्वाचे विधी या व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अनुष्का म्हणते, ‘वेळ इतक्या लवकर निघून गेला आणि तुम्हाला त्याची जाणीव नसेल तर ती जागा तुमच्यासाठी स्वर्गासारखीच आहे. मलाही असं वाटतं कारण मी सगळ्यात चांगल्या माणसाशी लग्न केलं आहे.’

https://www.instagram.com/p/BrPCIGkgkC8/

हे लव्हबर्ड्स लग्नाचा पहिला वाढदिवस ऑस्ट्रेलियामध्ये साजरा करणार आहेत. कारण विराट सध्या कसोटी स्पर्धेनिमित्त ऑस्ट्रेलियालात आहे. त्यामुळे हा दिवसा साजरा करण्यासाठी अनुष्काही तिकडे रवाना झाली आहे.

https://twitter.com/AnushkaSharma/status/1072359108274081797

Recommended

PeepingMoon Exclusive