By  
on  

सुहाना खान शुटिंग मोडवर, परदेशात करतेय शुटिंग

शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना काही दिवसातच बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. सुहानाचा देखील हाच विचार आहे. त्यामुळेच कि काय तिने प्रॉड्क्शनमधील बारकावे शिकून घेण्यास सुरुवात केली आहे.

सुहाना लंडनमध्ये सध्या एका शॉर्ट्फिल्म वर काम करत आहे. ही शॉर्ट फिल्म तिच्या प्रोजेक्ट्चा हिस्सा असल्याचं बोललं जात आहे.या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून शुटिंगची प्रोसेस समजून घेऊन त्यानुसार काम करणं सुहाना खुप एंजॉय करत असल्याचं सोशल मिडियातील फोटोंवरून दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BrLrmFVFBMz/

अलीकडेच सुहाना तिच्या रंगावरून ट्रोल झाली होती. तेव्हा शाहरुखने तिची बाजू उचलून धरली होती. त्यामुळे वडिलांचा वरदहस्त डोक्यावर घेऊनच सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल यात शंका नाही.

 

Recommended

PeepingMoon Exclusive