By  
on  

सुहाना फिल्म प्रॉड्क्शनमधील बारकावे शिकत आहे: शाहरुख खान

शाहरुखच्या आगामी झिरोचं प्रमोशन जोरात सुरु आहे. श्रवणीय संगीत असलेल्या गाण्यांसोबतच सिनेमाच्या ट्रेलरनेही प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घातली आहे. यासोबतच ‘झिरो’चं मेकिंगही रिलिज केलं जात आहे. या मेकिंगचं खास आकर्षण आहे ती सुहाना खान. सुहाना झीरोच्या प्रॉड्क्शन टीमसोबत दिसत आहे. याबद्द्ल शाहरुखला विचारलं असता त्याने सुहानाच्या डेब्युविषयी भाष्य केलं.

शाहरुख म्हणाला, ‘सुहाना अ‍ॅक्टींग बघण्यासाठीच आली होती. याशिवाय फिल्म प्रॉड्क्शनमधील बारकावे समजून घेणंही तिच्यासाठी महत्त्वाचं आहे. तरच ती पडद्यावर सक्षमपणे अभिनय साकारू शकेल.सुहाना आली तेव्हा आम्ही गाण्याचं शुटिंग करत होतो. ही प्रोसेस तिने समजून घेतली आणि तिला या प्रोसेसचा भागही होता आलं. सध्या ती याविषयीचं शिक्षण लंडनमध्ये घेत आहे.

सुहानाचा डेब्युविषयी शाहरुखला पुढे  म्हणाला, तिला अ‍ॅक्टींग करायची आहे. पण त्यासाठी अ‍ॅक्टींगमधील बारकावे शिकणंही गरजेचं आहे. सेटवर तिने अनुष्का आणि कतरिना कशाप्रकारे अभिनय करतात याचं निरिक्षणही केलं.
पण तिला अजून या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी 3-4वर्षं लागतील. सध्या ती लंडनमध्ये शिक्षण घेत असून लवकरच अमेरिकेला शिफ्ट होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive