By  
on  

लग्न इशा अंबानीचं, चर्चा मात्र दिपिका पदुकोणच्या टॅटूची

बॉलिवूडमध्ये कोणत्या गोष्टीची चर्चा कधी होईल सांगता येत नाही. आता हेच पहा ना, इशा अंबानीच्या लग्नात येणारे सेलिब्रिटी आणि त्यांचा लूक याचीच चर्चा जास्त झाली असेल.
त्यातही कळीचा मुद्दा बनला तो दिपिकाचा टॅटू. ही गोष्ट दिपिकाच्या नव्या टॅटूची नाहीये. तर चर्चा पुन्हा जुन्या टॅटूची आहे. लग्नानंतरचे काही दिवस दिपिकाच्या मानेवर असलेला ‘आरके’चा टॅटू दिसून येत नव्हता. त्यामुळे चाहत्यांना वाटलं कि दिपिकाने हा टॅटू काढून टाकला असावा. पण नुकत्याच इशा अंबानीच्या लग्नात तिच्या मानेवर हा टॅटू पुन्हा दिसल्याने नेटिझन्समध्ये चर्चेला उधाण आलं.

रणबीरशी रिलेशनशीप असताना दिपिकाने त्याच्या नावचं इनिशिअल टॅटू काढलं होतं. सध्या दिपिका आणि रणबीर दोघंही वेगवेगळ्या लोकांसोबत नात्यात असले तरी दिपिकाच्या मानेवर ‘आरके’चा टॅटू मात्र आहे तसा आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive