By  
on  

‘मुळशी पॅटर्न’चा रांगडेपणा भावला या अभिनेत्याला, बॉलिवूडमध्ये लवकरच रिमेक

मराठी सिनेमा दिवसेंदिवस अधिकच दर्जेदार होत चालला आहे. कारण पूर्वी हिंदी रिमेकसाठी साऊथच्या सिनेमांची निवड करणारे निर्माते आता मराठी सिनेमांची निवड करू लागले आहेत. ‘मुळशी पॅटर्न’ हे त्याचंच उत्तम उदाहरण आहे.
वेगळी धाटणी असलेल्या या सिनेमाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. यातील संवाद रांगड्या भाषेत असला तरी मनाला थेट जाऊन भिडत असल्याने हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
अलीकडेच अरबाज खानने हा सिनेमा पाहिला. त्यानंतर त्याने सलमानला देखील हा सिनेमा पहायला लावला. सलमान या सिनेमाच्या प्रेमातच पडला आहे. या चित्रपटाची कथा, मांडणी, संवाद या सगळ्याची सलमानला भुरळ पडली. त्याने आयुष शर्माच्या करीअरला उभारी देण्यासाठी सलमानने हा निर्णय घेतल्याचं समजतं.
‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा जमीनी विकल्या गेलेल्या शेतक-यांच्या मुलांचं आयुष्य कसं गुन्हेगारीच्या मार्गाने जाते या विषयाला हात घालणारा आहे. मराठीत या सिनेमाने 13 कोटीहून अधिक व्यवसाय केला आहे. हिंदीतही तो असाच करिष्मा करेल अशी आशा करायला हरकत नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive