By  
on  

नाना तनुश्री प्रकरणाला वेगळं वळण, काय म्हणते तनुश्री

बॉलिवूडमध्ये मी टू चळवळीमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अनेक नामी व्यक्तींची नावं आल्याने या चळवळीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या प्रकरणाशी जोडलं गेलेलं आणखी एक नामी नाव म्हणजे नाना पाटेकर.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर शोषणाच्या आरोपाने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी बॉलिवूडमध्येही दोन गट पडले. काही लोक नानाच्या बाजूने बोलू लागले तरे काही लोक तनुश्रीच्या बाजूने.

नानाविरुद्ध तनुश्रीने तक्रारही दाखल केली आहे. पण या प्रकरणाने अचानक वेगळं वळण घेतलं आहे. नानावर आतापर्यंत आरोप करणारी तनुश्री आता अमेरिकेला परत जाणार आहे. एक महिन्याच्या व्हिसावर आलेली तनुश्री तब्बल पाच महिने इथे राहिली. पण आता ती अमेरिकेला परत जात असून या प्रकरणात न्याय मिळेल अशी आशा आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive