By  
on  

आर्यन स्टारकिड असला तरी त्याला करीअरनिवडीचं पूर्ण स्वातंत्र्य: शाहरुख खान

बॉलिवूडमध्ये सध्या स्टारकिडच्या डेब्युचा सीझन सुरु आहे असं म्हटलं तर चुकिचं होणार नाही. कारण अलीकडेच सारा अलीखान, जान्हवी कपूर, हर्षवर्धन कपूर, प्रनुतन बहल अशा स्टार किड्सच्या पदार्पणाच्या चर्चा रंगल्या.

अशा वेळी आर्यन खान आणि सुहाना खान यांच्या डेब्युबद्द्ल शाहरुख खानला छेडलं असता त्याने आपली भूमिका स्पष्ट केली.

आर्यनच्या डेब्युबद्द्ल शाहरुख म्हणतो, ‘आर्यनला डेब्यु करायचं आहे हे सत्य असलं तरी तो अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये डेब्यु करु इच्छित नाही. त्याला निर्मिती आणि लेखनात रस आहे. त्यासंबधीचं शिक्षणही तो घेत आहे. पण त्याला तयार व्हायला अजून चार ते पाच वर्षं तरी जावी लागतील. त्यामुळे इतक्यात तो बॉलिवूडमध्ये येण्याची शक्यता जवळपास नाही.

यावेळी शाहरुख सुहानाच्या डेब्युबद्दलही बोलला. शाहरुख म्हणतो, ‘सुहानाला अभिनेत्री व्हायचं आहे, पण असं असलं तरी त्याआधी तिने फिल्म मेकिंगमधील बारकावे शिकुन घेणं गरजेचं आहे. सुहाना सध्या यासंबंधीचा अभ्यासक्रम लंडनमध्ये करत आहे. तो पूर्ण झाल्यावरच ती बॉलिवूडमध्ये येऊ शकेल. त्यामुळे सध्या तरी आर्यन किंवा सुहाना यापैकी कोणीही बॉलिवूड डेब्यु करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive