By  
on  

मिथून चक्रवर्तीच्या या लुकवरुन प्रेरित आहे, महेश शेट्टीचा ‘अण्णा’

हिंदी सिनेमातील दक्षिणात्य व्यक्तिरेखांचा उल्लेख जेव्हा जेव्हा होईल तेव्हा ‘अग्नीपथ’ या सिनेमातील मिथून चक्रवर्ती यांनी साकारलेली ‘कृष्णन अय्यर एम ए’ ही व्यक्तिरेखा आवर्जून लक्षात येते.

मिथून चक्रवर्ती यांनी संवाद आणि अभिनयाच्या माध्यमातून ही व्यक्तिरेखा अजरामर केली आहे. सहकलाकाराची भूमिका वाट्याला येऊनही मिथून यांनी आपल्या अभिनय कौशल्याने या व्यक्तिरेखेची दखल घेण्यासाठी भाग पाडलं.

अमिताभच्या पाठीमागे सावलीसारख्या उभ्या राहणा-या कृष्णन अय्यरला प्रेक्षक आजही विसरु शकले नाहीत. त्या व्यक्तिरेखेने अनेक कलाकारांना प्रेरणा दिली आहे. त्यापैकी एक म्हणजे अभिनेते महेश शेट्टी. महेश शेट्टी हे अवधूत गुप्ते आणि वजीर सिंग निर्मित सिनेमा ‘कोल्हापूर डायरी’ यात एका दाक्षिणात्य व्यक्तीची भूमिका साकारत आहे. या सिनेमातील त्यांचा लूक पाहिल्यास अमिताभच्या ‘अग्नीपथ’मधील कृष्णन अय्यर एम ए या व्यक्तिरेखेची आवर्जून आठवण येते. या सिनेमात महेश यांच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे आण्णा. हा आण्णा मुळचा दक्षिणेकडील असला तरी तो कोल्हापुरमध्ये स्थायिक झालेला आहे.

त्यामुळेच कोल्हापूरशी, तिथल्या मातीशी, तिथल्या लोकांशी त्याचे ऋणानुबंध आहेत. त्याच्या वागण्या, बोलण्यात अस्सल कोल्हापुरी बाज जाणवतो तो यासाठीच.

आण्णाच्या व्यक्तिरेखेविषयी महेश शेट्टी सांगतात, आण्णा दक्षिणेकडचा असला तरी त्याचं कोल्हापूरवर नितांत प्रेम आहे. त्याच्या लूकवरून तो निगेटिव्ह वाटत असला तरी त्याच्या व्यक्तिरेखेला अनेक शेड्स आहेत. प्रेक्षकांना पडद्यावर आण्णाची व्यक्तिरेखा पाहायला आवडेल.’ असंही ते म्हणाले.

 

Recommended

PeepingMoon Exclusive