By  
on  

कायद्याच्या कचाट्यातून ‘झिरो’ची सुटका, प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

सिनेमा आणि त्यासोबत निर्माण होणारे वाद यांचं नातं तसं जुनंच आहे. पण या प्रकारामुळे सिनेमाची प्रसिद्धीच जास्त होते. पण या प्रकारामुळे निर्मात्याला अनेकदा सिनेमातील काही दृश्यांमध्येही बदल करावे लागतात.
शाहरुखच्या बहुचर्चित ‘झिरो’ला ही या वादाचा सामना करावा लागला. शिखांना पुज्य असलेल्या कृपाणशी संबंधित दृश्य सिनेमात असल्यामुळे शीख धर्मियांनी भावना दुखावल्याचा आरोप करत निर्मात्यांविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. यावर तोडगा म्हणून शीख समुदायाच्या मागणीनुसार शाहरुखने कृपाण धारण केल्याचं दृश्य सिनेमातून वगळलं गेलं आहे. त्यामुळे शीख समुदायाने न्यायालयातील याचिका मागे घेतली. अशा पद्धतीने ‘झिरो’ च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.


यापूर्वीही अनेका सिनेमांना अशा प्रकारच्या विवादांना सामोरं जावं लागलं आहे. त्यामध्ये संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’चा समावेश पहिल्या स्थानावर आहे.
आता झिरोच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाल्याने निर्मात्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. हा सिनेमा २१ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. शाहरुख खानसोबतच अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive