By  
on  

एका वर्षानंतर कॉमेडी किंग कपिलची वापसी, ‘सिंबा’च्या कलाकारांसोबत केली धमाल

एकेकाळी फॉर्मात असलेल्या ‘द कपिल शर्मा शो’ला नजर लागली आणि या सर्वात लोकप्रिय शो ला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला. दरम्यान अनेक वादांमध्ये कपिलचं नाव नेहमीच पुढे असायचं. कधी कॉमेडीयन सुनील ग्रोव्हरशी भांडण तर कधी वादग्रस्त ट्वीट केल्यानं कपिल नैराश्येच्या गर्तेत सापडला होता. व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर आल्यानंतर त्याच्यात बरीच सुधारणा झाली. नुकताच आपली मैत्रिण गिन्नीसोबत तो बोहल्यावरही चढला.

पण आता कपिला शर्मा शो च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, कपिल शर्मा शो पुन्हा प्रसारित होणार आहे. २९ डिसेंबरपासून हा शो पुन्हा सुरु होणार आहे. सोनी वाहिनीकडून या शो चा टीजर प्रसारित केला गेला आहे. विशेष म्हणजे या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये सिंबाची टीम येणार आहे.

https://twitter.com/SonyTV/status/1075044789173792774

या सोबतच वाहिनीने आणखी एक टीजर प्रदर्शित केला आहे. यामध्ये सलमान खान भाऊ अरबाज खान आणि वडिल सलीम खान यांच्यासोबत आहे. या टीजरमध्ये सगळ्या कलाकारांचे दिलखुलासपणे हसतानाचे स्नॅप आहेत.

https://www.instagram.com/p/BrarU7ThiqT/?utm_source=ig_web_copy_link

यासोबतच एक टॅगलाईनही दिसते. ‘पुरे इंडिया को हसाने आ रहा है, द कपिल शर्मा शो’ या टॅगलाईनसहित कपिलचं पुनरागमन होत आहे. या नव्या शोमध्ये कृष्णा अभिषेकही आहे. याशिवाय किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर आणि भारती सिंह आहे. कपिलच्या पुनरागमनाला पूर्वी इतकंच यश मिळू दे. अशी प्रार्थना त्याचे चाहते करत आहेत.

 

Recommended

PeepingMoon Exclusive