असं पार पाडलं देसी गर्लचं रिसेप्शन, वडिलांच्या आठवणीने भावूक झाली पीसी

By  
on  

प्रियांका चोप्रा-निक जोनास यांचा विवाह राजस्थानमधील उमेद भवन पॅलेस येथे थाटामाटात पार पडला. त्यानंतर पीसीने दिल्ली येथे रिसेप्शन ठेवलं होतं. या रिसेप्शनला खुद्द पंतप्रधानांनी हजेरी लावली होती.

या रिसेप्शननंतर पीसी कर्मभूमी असलेल्या मुंबईमध्ये असलेल्या रिसेप्शनची तारीख कधी जाहीर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार पीसीने मुंबईमधील रिसेप्शनसाठी जोरदार तयारी केली होती. त्याआधी पीसी आणि निक शॉर्ट हनीमूनसाठी ओमानला जाऊन आले. यावेळी प्रियांकाच्या फोटोंचं नेटिझन्सनी बरंच कौतुक केलं होतं.

[video width="640" height="800" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/12/manav.manglani_49012212_2039599066339872_7165388704075218944_n.mp4"][/video]

प्रियांकाचं मुंबईमधील रिसेप्शन नुकतंच पार पडलं. या रिसेप्शनमध्ये निकने ग्रे कलरचा सुट घातला होत. तर प्रियांकाने स्ट्रीपलेस ब्ल्यु लेहेंगा घातला होता. प्रियांकाने भांगात सिंदूर कॅरी केला होता. पण मंगळसुत्राची जागा हेवी नेकलेसने घेतली होती.

[video width="640" height="640" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/12/manav.manglani_49197972_769660460065442_7738363553547026432_n.mp4"][/video]

प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी सर्व पाहुण्यांचं स्वागत केलं. यावेळी बोलताना प्रियांका वडिलांच्या आठवणीने भावूक झालेली दिसली. तिने आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले.

Recommended

Loading...
Share