By  
on  

सर्वांचा लाडका ‘टिम’ झाला दोन वर्षांचा, सैफ-करिनानं केलं जोरदार सेलिब्रेशन

बॉलिवूडमध्ये लहानपणापासूनच अपार प्रसिद्धीचं धनी कोण असेल तर छोटे नवाब तैमुर अली खान पतौडी. या ‘टिम’ अर्थात तैमुरचा आज दुसरा वाढदिवस आहे.

कुणालाही मोहात पाडतील अशा मोहक बाललीला, चेह-यावरच स्पष्ट दिसणारा खोडकरपणा यामुळे तैमुर अगदी कमी वयापासूनच मिडियाच्या आकर्षणाचं केंद्र बनला आहे.

त्याची प्रत्येक धडपड टिपण्यासाठी पत्रकारांचे कॅमेरे सरसावलेले असतात.


तैमुर केवळ करिना आणि सैफचा मुलगा आहे म्हणून प्रसिद्ध नाही तर त्याचं स्वत:चं असं फॅन फॉलोइंग आहे.


त्याच्या आतापर्यंतच्या प्रत्येक लूकला नेटिझन्सनी जोरदार प्रसिद्धी दिली आहे.


तैमुर सध्या त्याच्या दुस-या वाढदिवसाच्यानिमित्ताने आई करीना आणि वडिल सैफ यांच्यासोबत दक्षिण अफ्रिकेत आहे. सैफ आणि करीना सध्या अफ्रिकेत सूट्ट्यांचा आनंद घेत असून लवकरच भारतात परततील.

अलीकडेच सैफ आणि करीनाने तैमुरची प्री-बर्थ डे पार्टी ही अरेंज केली होती. या पार्टीमध्ये अब्राम खान, यश-रुही जोहर, निशा कौर वेबर, लक्ष्य कपूर हे स्टार किड्स आले होते.

Recommended

PeepingMoon Exclusive