By  
on  

देसी गर्लच्या रिसेप्शनमध्येही रंगला मस्तानी-काशीबाईंचा पिंगा, बाजीरावही झाला सामील

ही वर्षअखेर बॉलिवूड्करांसाठी लग्नसोहळ्यांनी सजलेली ठरली. दिप-वीर, प्रियांका-निक यांच्या रिसेप्शनमध्ये सगळ्या बॉलिवूडकरांनी उपस्थिती लावली.
पण सगळ्यात खास ठरलं ते प्रियांका अणि निकचं रिसेप्शन. याला कारणही तसंच आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रियांका अणि निकच्या रिसेप्शनमध्ये दीप वीरही सहभागी झाले होते. यावेळी प्रियांका आणि दिपिकाने बाजीराव-मस्तानीमधील ‘पिंगा ग पोरी’ या गाण्यावर डान्स केला. यावेळी दोघींची केमिस्ट्री अगदी उत्तम दिसून आली.

https://www.instagram.com/p/BrpBaiPlR9M/?utm_source=ig_web_copy_link

पण मस्तानी अणि काशीबाईला नाचताना बाजीरावला देखील नाचायचा मोह आवरला नाही. या दोघींच्या पिंग्यात काही ठुमके रणवीरने देखील लावले.

[video width="640" height="800" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/12/peeping.moon_48908522_200031124275650_1692084206861025280_n1.mp4"][/video]

यावेळी उपस्थितांनाही हे क्षण कॅमेरात साठवण्याचा मोह आवरला नाही.

यानंतर होस्ट प्रियांका आणि निकने देखील ‘गल्ला गुडियां’ या गाण्यावर डान्स केला. प्रियांकाने ‘देसी गर्ल’ या गाण्यावरही दिलखुलास नृत्य केलं.

Recommended

PeepingMoon Exclusive