By  
on  

वाढदिवसानिमित्त अनिल कपूर यांना मिळालं अनोखं गिफ्ट, लेकीसोबतच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

बाप लेकीच्या नात्यावर आधारित असलेले सिनेमे बॉलिवूडच्या नशिबात फारसे नाहीत. पण ही कमतरता अनिल आणि सोनम कपूरच्या ‘एका लडकी को देखा तो ऐसा लगा’ या सिनेमातून भरून निघेल असं वाटत आहे.

विशेष म्हणजे आज अनिल कपूर यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने या सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे. या सिनेमात अनिल कपूर, सोनम कपूर, राजकुमार राव यांच्या भूमिका आहेत.

 

या पोस्टरमध्ये सोनमने वडिलांच्या खांद्यावर डोकं ठेवलं आहे. यावरून हा सिनेमा बापलेकीच्या हृद्य नात्यावर भाष्य करणारा आहे हे समजून जातं.

सोनम पहिल्यांदाच वडिलांसोबत स्क्रीन शेअर करत असल्याने भलतीच खुश आहे. हा सिनेमा लव्ह जिहादच्या विषयाला हात घालणारा असल्याचं बोललं जात आहे.

येत्या काही दिवसातच या सिनेमाचा टीजर रिलीज होईल.

Recommended

PeepingMoon Exclusive