By  
on  

कपिलच्या रिसेप्शनमध्ये दीपवीरच्या डान्सचा जलवा, रणवीरने म्हटलं गाणं

ही वर्षाखेर बॉलिवूडकरांसाठी लग्नसराईची ठरली आहे. दिपिका-प्रियांका यांसारख्या बॉलिवूड दिवाजचं लग्न, रिसेप्शनमुळे माहोल अगदी लग्नघरासारखा वाटू लागला.

या दोघी अभिनेत्रींच्या लग्न आणि रिसेप्शनच्या बातम्या संपतात न संपतात तोच आणखी एका कलाकाराच्या रिसेप्शनची बातमी येऊन धडकली. हा कलाकार आहे कपिल शर्मा.

कपिलने अलीकडेच प्रेयसी गिन्नी चतरथसोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्या. नुकतंच कपिलचं रिसेप्शनही पार पडलं. पण या रिसेप्शनमध्ये ख-या अर्थाने रंग भरले ते रणवीर सिंगने.

[video width="480" height="600" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/12/peeping.moon_49332352_2536590043048747_6869128890858602496_n.mp4"][/video]

निळ्या रंगाचा सुट घातलेल्या रणवीरने मैफलीत एक प्रकारे रंग भरला. रणवीरने यावेळी गाणं तर गायलंच. पण या गाण्यावर ठुमके लावले ते खुद्द श्रीमती रणवीर सिंगने. रणवीरने गायलेल्या ‘मै तेरा हिरो’ या गाण्यावर दिपिका डान्स करताना दिसून आली.

विशेष म्हणजे प्रियांका-निकच्या रिसेप्शनमध्येही दिपिकाने प्रियांकासोबत पिंगा गाण्यावर डान्स केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याला भरपूर लाईक्सदेखील मिळाले होते. आता लाल साडी नेसलेल्या दिपिकाचा कपिलच्या रिसेप्शनमधला डान्स व्हायरल होत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive