नागराज मंजुळेंच्या स्क्रिप्टच्या प्रतिक्षेत आहे, बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान

By  
on  

मनोरंजन विश्वातील एक अनोखी मुलाखत नुकतीच पार पडली. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ११ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाची आणि दोन तीन वर्षातून एक सिनेमा करणा-या आमिर खानच्या या प्रोजेक्टची खुप चर्चा आहे. या सिनेमाबाबत  नुकतीच प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आमिर खानची मुलाखत घेतली. 

या मुलाखतीच्या शेवटी आमिरने नागराज मंजुळेंचं कौतुक तर केलंच पण त्यांच्या स्क्रिप्टच्या प्रतिक्षेत असल्याचंसुध्दा म्हटलं आहे.  “मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. तुम्हाला याची कल्पनाही नाही.असं गौरवोद्गार आमिरने नागराज मंजुळेंसाठी काढले. तुम्हाला जो सिनेमा करायचा आहे, तो माझ्याकडे घेऊन या आपण त्यावर काम करु, मला समोर ठेऊन तुम्ही सिनेमा लिहून नका. तुमचा झुंड सिनेमा मला फार भावला. तुम्ही कुठल्याही भाषेत सिनेमा करा मराठी असो किंवा मग हिंदी मी तुमच्यासोबत काम करायला खुप उत्सुक आहे. 

आमिर खान आणि करीना कपूर खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. अद्वैत चंदन यांचं दिग्दर्शन असेलल्या या चित्रपटाची पटकथा एरिक रोथ आणि अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे. हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Recommended

Loading...
Share