'राजू श्रीवास्तव यांची तब्येत स्थिर आहे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं कुटुंबीयांचे आवाहन

By  
on  

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार चालू असून हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, राजू श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दलच्या अफवा सुरू झाल्या आहेत. मुंबईतील काही वेबपोर्टलवर त्यांच्यासाठी शोकसंवेदनाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. अनेकांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजू यांच्या निधनाबाबत पसरलेल्या या अफवांदरम्यान कुटुंबीयांनी माहिती दिली आहे.

'राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून आम्ही सगळे त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहोत, त्याचबरोबर त्यांचे अनेक चाहते देखील त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर योग्य ते उपचार करत आहे. दरम्यान कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका' असं राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांनी म्हटलेलं आहे. कॉमेडियन-अभिनेता राजू श्रीवास्तव दिल्लीतील एम्स (ICU) मध्ये व्हेंटिलेटरवर आहेत. राजू श्रीवास्तव यांना बुधवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली. वृत्तानुसार, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असून ते आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत.

Recommended

Loading...
Share