सोनम कपूरला मुलगा झाला हो ! अभिनंदनाचा होतोय वर्षाव

By  
on  

अभिनेत्री सोनम कपूर-अहुजाच्या घरी पाळणा हलला आहे. सोनमने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तिला पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. आता स्वतः सोनमनेच एक खास पोस्ट शेअर करत आपल्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालं असल्याचं सांगितलं आहे.

सोनमनेच इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ती पोस्ट करत म्हणाली, “२० ऑगस्ट २०२२ रोजी आमच्या घरी एका गोंडस मुलाचं आगमन झालं आहे. डॉक्टर्स, नर्स, मित्र परिवार आणि कुटुंबियांचे मनापासून आभार. माझ्या संपूर्ण प्रवासामध्ये या सगळ्यांनी मला पाठिंबा दिला. ही फक्त सुरुवात आहे. पण आम्हाला माहित आहे की आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे.”

Recommended

Loading...
Share