By  
on  

बहुचर्चित ‘द : अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरचा ट्रेलर रिलीज, उलगडणार मनमोहन सिंग यांची कारकिर्द

राजकारण आणि राजकारणी याविषयी सामान्य व्यक्तीला नेहमीच कुतुहल असतं. त्यामुळेच सिनेमाच्या माध्यमातून का होईना राजकारण्यांविषयी जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते. नेमकं हेच हेरुन दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टे यांनी ‘द : अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणला आहे.
मनमोहन सिंग यांचे मिडिया सल्लागार असलेले संजया बारु यांच्या ‘द : अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकावर हा सिनेमा आधारलेला आहे. या सिनेमाची चर्चा त्याच्या निर्मितीपासूनच होती.
या सिनेमात अनुपम खेर डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका साकारताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अनुपम हुबेहुब मनमोहन यांच्यासारखेच दिसत आहेत.

या सिनेमात संजया बारू यांच्या भूमिकेत आहे, अक्षय खन्ना. अक्षय ब-याच मोठ्या कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसेल.


हा सिनेमा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज होणार आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्माता हंसल मेहता यांचा प्रयत्न असेल.


४३ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये संजय सुरुवातीलाच नमूद करतात की डॉ. मनमोहन सिंग आणि महाभारतातील भीष्म यांच्या व्यक्तिरेखेत खुपच साम्य आहे. पण त्यांना एका कुटुंबाच्या मर्जीनुसार चालावं लागलं.
ट्रेलर बघताना वरवर वाटणा-या ब-याच बाबी वेगळंच सांगून जातात. त्यामुळेच हा सिनेमा रिलीज होण्यावेळी कोणती कॉन्ट्रावर्सी व्हायची शक्यता नाकारता येत नाही.

https://www.youtube.com/watch?time_continue=2&v=q6a7YHDK-ik

Recommended

PeepingMoon Exclusive