दादासाहेब फाळके पुरस्काराने आशा पारेख यांचा गौरव

By  
on  

भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर करण्यात आला आहे. सिनेसृष्टीतील भरीव योगदानाबदद्ल त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली. 

आपल्या दमदार अभिनयाने ६० ते ७० च्या दशकात बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. त्या ७९ वर्षांच्या आहेत. ६०-७० च्या दशकात त्या त्यांच्या मानधनामुळेही चर्चेत असायच्या. 

 

Recommended

Loading...
Share