By  
on  

Peepingmoon च्या बातमीवर शिक्कामोर्तब ! सुश्मिता सेन झळकणार ट्रान्सजेंडर म्हणून, दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव यांच्याकडे

ट्रान्सजंडर किंवा तृतीयपंथी हा नेहमीच कुतुहूलाचा विषय ठरला आहे. याबाबत समाजातसुध्दा अनेकदा कुजबूज होताना पाहायला मिळते. आजही तृतीयपंथीयांना सन्मानाची वागणूक मिळत नाही, हे कटू सत्य आहे. याच विषयावर आधारित ट्रान्सजेंडर एक्टिव्हिस्ट गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारीत एक नवी कोरी वेबसिरीज प्रेक्षकांच्या  भेटीला येतेय आणि यात या ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत अभिनेत्री सुश्मिता सेन झळकतेय. 

पिपींगमूनने एक्स्क्ल्युझिव्हरित्या दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री सुश्मिता सेन ही गौरी सावंत या ट्रान्सजेंडरची भूमिका साकारतेय. पिपींगमूनने याबाबतच वृत्त आधीच दिलं होतं. आज रवी जाधव आणि सुश्मिता सेन यांनी या सिरीजचा फर्स्ट लुक शेयर करत यावर शिक्का मोर्तब केलं. 

सुश्मिता सेनने तिच्या इन्स्टाग्रामवर वेब सीरिज ‘ताली’चा लूक शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलं, “ताली- बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! या सुंदर व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारण्याचं आणि तिची कथा जगासमोर आणण्याचा भाग्य मला मिळालं यापेक्षा अभिमानास्पद काहीच नाही. मी कृतज्ञ आहे की मला ही संधी मिळाली. इथे आपलं आयुष्य सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. खूप सारं प्रेम.”

इथे वाचा  संपूर्ण बातमी

https://peepingmoon.com/exclusive-news/news/66408/PeepingMoon-Exclusive-Sushmita-Sen-to-play-a-transgender-in-her-Voot-Select-series-directed-by-Ravi-Jadhav.html

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive