By  
on  

प्रेक्षकांना पसंत पडला ठाकरे सिनेमाचा ट्रेलर, पण खटकली ही बाब

बाळासाहेब ठाकरे या नावाची जादू अजूनही जनमानसावर आहे. त्यामुळेच कि काय या नावाखाली माथी मारलेली कोणतीही इतर बाब ते सहन करु शकत नाहीत.बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ठाकरे सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला. हिंदी आणि मराठी भाषेत रिलीज झालेल्या ट्रेलरला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

हिंदी भाषेत रिलीज झालेल्या ट्रेलरला नवाजुद्दीन सिद्दीकीचा आवाज आहे. तर मराठी भाषेतील ट्रेलर आणि सिनेमाला सचिन खेडेकर बाळसाहेबांचा बनले आहेत.

पण यावर मात्र अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाळासाहेबांचा धारदार आवाज या सिनेमात मिसिंग असल्याची तक्रार अनेकांनी बोलून दाखवली.

बाळासाहेब आणि सचिन यांच्या आवाजात संवादशैलीत कोणतंही साम्य नसल्याने बाळासाहेबांच्या आवाजाचा फिल संपूर्ण ट्रेलरभर मिसिंग राहतो. त्यामुळेच बाळासाहेबांच्या मूळ आवाजाला न्याय देईल असा आवाज सिनेमात वापरण्याची मागणी रसिकांकडून केली जात आहे. आता दिग्दर्शक आणि निर्माते या मागणीला न्याय देतात का ते पाहू.

https://youtu.be/INOTrg-wQgE

Recommended

PeepingMoon Exclusive