By  
on  

विवादास्पद असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर झाला युट्युबवरून गायब, चाहत्यांचं युट्युबला साकडं

सिनेमा आणि विवादांचं नातं बॉलिवूडला नवीन नाही. बॉलिवूडचे अनेक सिनेमे यापूर्वीही विवादात अडकले आहेत. या यादीत आता आणखी एका सिनेमाची भर पडली आहे.

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. त्यानंतर या सिनेमाभोवती वादाचं वलय जमा होऊ लागलं. आता तर या सिनेमाचा ट्रेलरच युट्युबवरुन हटवला गेला आहे.

या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. पण यात काही आक्षेपार्ह बाबी असल्याचं सांगून एका राजकीय पक्षाने या सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली होती.

या सिनेमात अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. या सिनेमात अनेक तत्कालीन विवादास्पद विषयावर भाष्य केलं असल्याने या सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली होती. आता या सिनेमाचा ट्रेलरच युट्युबवरून गायब झाल्याने प्रेक्षकांनी युट्युबला साकडं घातलं आहे.

अभिनेते अनुपम खेर यांनीही या सिनेमाचा ट्रेलर गायब झाल्याबद्द्ल ट्वीट करून नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणतात, डिअर युट्युब, मला अनेका फोन आणि मेसेज येत आहेत. देशातील काही भागात युट्युबवर ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर दिसत नाही. कृपया मदत करावी.’ आता या ट्वीटवर युट्युब काय अ‍ॅक्शन घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा सिनेमा विजय गुत्ते यांनी दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा ११ जानेवारी २०१९ ला रिलीज होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive