By  
on  

आलिया पडली आहे ‘एडवर्ड’च्या प्रेमात, पाहा कोण आहे एडवर्ड

ब्रम्हास्त्र सिनेमाचं शूटिंग सुरु असताना आलिया आणि रणबीरच्या प्रेमाचा सिलसिला सुरु झाला. सोनमा कपूरच्या लग्नात या दोघांची एकत्र एंट्री त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करणारी होती.
त्यानंतर या ना त्या कारणाने आलिया आणि रणबीर एकत्र दिसू लागले. कृष्णा कपूर गेल्या तेव्हा आलियाचा घरच्या सद्स्यासारखा वावर, ऋषी कपूर यांच्या फॅमिलीच्या फोटोमध्ये रणबीरसोबत दिसणारी आलिया या सगळ्यांमुळे त्यांना एकत्र पहायची सवय फॅन्सना देखील होती.
विशेष म्हणजे महेश भट्ट् यांच्या घरी रात्री अचानकपणे जाऊन रणबीरने मारलेल्या गप्पा हे देखील बरंच काही सुचवणारं होतं. त्यानंतर महेश भट्ट यांनीही आलिया आणि रणबीर यांच्या नात्याबद्दल अप्रत्यक्षरित्या कबुली दिली होती.
त्यामुळे ही जोडी लग्नाच्या बेडीत कधी अ‍डकणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे. आपल्या नात्याबद्द्ल रणबीर किंवा आलिया कधीही उघडपणे बोलले नाहीत. रणबीरला मध्यंतरी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये या नात्याबद्द्ल विचारल्यावर त्याने नात्यात असल्याची कबुली तर दिली होतीच. पण कुणासोबत नात्यात आहे याबद्द्ल बोलणं टाळलं होतं.

https://www.instagram.com/p/BjbndpWnqyd/?utm_source=ig_web_copy_link

आलियानेदेखील या विषयावर मौन बाळगणं पसंत केलं होतं. पण आलियाने आता अंशत: का होईना रणबीरसोबतचं नातं स्विकारलं आहे.
एका मुलाखतील आलियाने ही बाब स्पष्ट केली आहे. आलिया म्हणते, ‘ मला मांजरं खुप आवडतात. मी देखील मांजरांसारखीच आहे. मला लाड करून घ्यायला आवडतात. यासोबत मला जे हवं तेच करत असल्याने मांजरांच्यात आणि माझ्यात याबाबतीत बरंच साम्य आहे. त्यामुळेच मी एडवर्डच्या ( आलियाचं पाळीव मांजर) प्रेमात आहे.


या दरम्यान रणबीर आणि तिच्या नात्याबद्द्ल बोलताना ती म्हणते, ‘मला माझं खासगी आयुष्य आणि नातेसंबंधांमधील प्रामाणिकपणा जपायला आवडतो’. माझ्या आयुष्यात जे काही आहे ते छान आहे. माझ्या मांजरींना सुरक्षित वाटायला लावणं हे मनापासून आवडतं.’

Recommended

PeepingMoon Exclusive