By  
on  

अरबाजने समोर आणलं सलमानचं हे गुपित, ‘द कपिल शर्मा शो’मध्ये केली धमाल

सलमान खानचा आणि त्याच्या कुटुंबियांचा एकमेकांशी असलेला बॉण्ड किती घट्ट आहे याचा प्रत्यय चाहत्यांना अनेकवेळा येत असतो.

सलमानची प्रतिमा कशी आहे हा वादाचा विषय असला तरी एका बाबतीत मात्र सलमान अगदी सभ्य आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ही बाब आहे किसिंगची. सलमानने आजपर्यंत क्वचितच ऑनस्क्रीन किसिंग केलं असेल.

सलमान शर्ट उतरवायला लाजणार नाही पण ऑनस्क्रीन किसिंग मात्र तो टाळतो. तो असं का करत असावा, हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावत असे. पण या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. या प्रश्नाचं उत्तर दुसरं तिसरं कोणी दिलं नसून खुद्द अरबाज खाननेच सलमानचं हे रहस्य सगळ्यांसमोर आणलं आहे.

‘द कपिल शर्मा शो’ या शोचा प्रोमो नुकताच रिलीज झाला असून यात कपिल सलमानला विचारतो कि, नवख्या अभिनेत्रीसोबत काम करताना अवघडल्यासारखं होत नाही का? त्यावर सलमान उत्तर देतो की मी पडद्यावर किसिंग सीन करत नसल्याने मला अवघडल्यासारखं वाटत नाही.

यावर अरबाज म्हणतो, कि ‘तो ऑफस्क्रीन किस करत असल्याने त्याला ऑनस्क्रीन करण्याची गरज वाटत नाही. यावर सेटवर हास्याचा फवारा उडतो.

द कपिल शर्मा शो च्या यावेळच्या एपिसोड्मध्ये सलमान, अरबाज आणि सोहेल पाहुणे बनून आले आहेत. हे तिघं या शोमध्ये लहानपणीच्या आठवणी शेअर करताना दिसून येत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=E_MBIvA0Z_c

Recommended

PeepingMoon Exclusive