By  
on  

द अ‍ॅक्सिडेंट्ल प्राईम मिनिस्टर’ या सिनेमाच्या मागचं ग्रहण सुटता सुटेना, आता दाखल झाली तक्रार

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवर बेतलेला सिनेमा ‘द अ‍ॅक्सिडेंट्ल प्राईम मिनिस्टर’ बद्दलचे वाद दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. मनमोहन सिंग यांचे मिडिया सल्लागार असलेले संजय बारु यांच्या ‘द : अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकावर हा सिनेमा आधारलेला आहे. या सिनेमाची चर्चा त्याच्या निर्मितीपासूनच होती.
काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर युट्युबवरुन गायब झाल्याची चर्चा होती. त्याबद्द्ल अनुपम खेर यांनीही युट्युबकडे नाराजी व्यक्त केली होती. पण आता या सिनेमाशी आणखी एक वाद जोडला गेला आहे.

या सिनेमातील काही दृश्य काही राजकारण्यांची प्रतिमा मलीन करत असल्याचा आरोप केला गेला आहे. काँग्रेसने चित्रपटावर आक्षेप घेतला असून यामधून गांधी कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान अभिनेता अनुपम खेर यांच्याविरोधात बिहार न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील सुधीर कुमार ओझा यांनी मुझफ्फरपूर मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात ही तक्रार दाखल केली आहे. हा सिनेमा रिलीज होईपर्यंत मागे लागलेलं वादाचं ग्रहण सुटण्याची चिन्ह दिसत नाहीत.
हा सिनेमा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज होणार आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्माता हंसल मेहता यांचा प्रयत्न असेल.

Recommended

PeepingMoon Exclusive