By  
on  

जॉन अब्राहमही पडला पोलिसपटांच्या प्रेमात, पडद्यावर पुन्हा एकदा साकारणार पोलीस

अलीकडे पोलीसपटांचा ट्रेंड जोरात सुरु आहे. या ट्रेंडपासून जॉन अब्राहम तरी कसा लांब राहील. पिळदार शरीरयष्टीसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता जॉन अब्राहम त्याच्या अनेक भूमिकांसाठी नावाजला जातो. ‘दोस्ताना’ सिनेमातील शर्ट्लेस लूकनंतर त्याच्या स्त्री चाहत्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
जॉन मध्यंतरी पोखरण, सत्यमेव जयते अशा सिनेमातून दिसला होता. पोखरणमध्ये तो सैन्यदलातील अधिका-याच्या भूमिकेत होता. सत्यमेव जयते या सिनेमात तो भ्रष्ट पोलीस अधिका-यांना धडा शिकवणा-या पोलीसाच्या भूमिकेत होता.
जॉनचा आताही एक पोलीसपट येणार असल्याची खबर सुत्रांकडून मिळाली आहे. ‘ऑफिसर खान’ असं त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनावर असलेल्या या सिनेमात जॉन काय कमाल दाखवेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive