By  
on  

आलिया भट झळकणार आणखी एका रिमेकमध्ये, पुन्हा वरुण धवनसोबत केमेस्ट्री दिसणार

आलिया भटचे तारे सध्या ‘सातवे आसमान’वर आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सध्या आलियाकडे एक से बढकर एक असे सिनेमे आहेत. याशिवाय तिच्या रिअल आयुष्यात भेटलेला मि. परफेक्ट रणबीर कपूर हे देखील तिच्या आनंदाच कारण आहे.

आलियाच्या चाहत्यांच्या आनंदातही भर पडणार आहे. कारण आलिया आणि वरुण ही सुपरहिट जोडी आता एका रिमेकमध्ये झळकणार आहे.

हा रिमेक आहे, गोविंदाचा ब्लॉकब्लस्टर सिनेमा ‘कुली नंबर १’. १९९५ साली प्रदर्शित झालेल्या मूळ सिनेमात गोविंदा आणि करिष्मा कपूर यांच्या जोडीने धमाल उडवून दिली होती. हेच करण्यासाठी आता वरुण आणि आलिया सज्ज आहेत. डेव्हिड धवन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाची अधिकृत  घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

आलिया सध्या ‘गली बॉय’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा १४ फेब्रुवारीला रिलीज होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive