By  
on  

‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी जिंकणार का आपला मराठमोळा शिव ठाकरे ? सर्वत्र शिवचीच हवा!

बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉस १६ मुळे चर्चेत आहे. त्याच्या खेळाचं -स्ट्रॅटेजी प्लॅन करण्याचं प्रचंड कौतुक होत आहे. त्याचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. बिग बॉस 16 च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये पोहचलेला आपला मराठमोळा शिव ठाकरे हा या सीझनच्या विजेतेपदाचा दावेदार मानला जातो. या शोमध्ये त्याने भल्याभल्यांना कॉंटे की टक्कर दिली. या सीझनमध्ये त्याची सर्वाधिक चर्चा झाली. आता ग्रॅण्ड फिनालेसाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. शिवला महाराष्ट्रातून खूप पाठिंबा मिळताना दिसत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

 

आता ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफीही शिवच्याच हातात असावी यासाठी त्याचे चाहते, कुटुंबिय प्रार्थना करत आहेत. तर मराठी कलाकारांनीही शिवला वोट करा असं सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

 

 

तर काही जणांच्या हातामध्ये शिवचं पोस्टर आहे. शिवला प्रेक्षकांचा व त्याच्या चाहत्यांचा अधिकाधिक पाठिंबा मिळत आहे. अवघ्या काही दिवसांवरच ‘बिग बॉस १६’चा अंतिम सोहळा आहे. आता घरामध्ये फक्त शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियंका चौधरी, शालीन भानोत व अर्चना गौतम हे पाच सदस्य राहिले आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive