By  
on  

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकची पहिली झलक पाहिलीत का? हा अभिनेता साकारतोय व्यक्तिरेखा

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा सीझन सुरु आहे असं म्हटलं तर हरकत नसावी. कारण या महिन्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘ठाकरे’, डॉ. मनमोहंसिंग यांच्या आयुष्यावर आधारित ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ आणि झाशीच्या राणीचा लढा प्रेक्षकांसमोर आणणारा मणिकर्णिका हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. आता याच यादीत आणखी एका सिनेमाची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावरही सिनेमा बनवला जाणार आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ असं या बायोपिकचं नाव असेल.

यात विवेक ओबेराय पंतप्रधानांची व्यक्तिरेखा साकारत असून त्याचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. या लूकमध्ये विवेक कुठेही ओळखू येत नाही. हा लूक पंतप्रधानांच्या लूकच्या जवळपास जाणारा असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. खरं तर अनेक वर्ष सिनेसृष्टीपासून लांब असलेल्या विवेक ओबेरॉयची या सिनेमासाठी झालेली निवड अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन उमंग कुमार करणार आहेत. उमंग यांनी यापूर्वी मेरी कोम आणि सरबजीत यांसारख्या बायोपिक्सचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा 23 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या महिन्यात सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होईल.

https://twitter.com/taran_adarsh/status/1082229787186335744

Recommended

PeepingMoon Exclusive