By  
on  

आता या अभिनेत्रीच्या आयुष्यावर बनणार सिनेमा, बायोपिकची पटकथा करणार कॉपीराईट

अभिनेत्री श्रीदेवीची अकाली एक्झिट प्रत्येकालाच चटका लावून गेली. एक अत्यंत गुणी आणि रुपवान अभिनेत्री आपल्यातून गेल्याची खंत तिच्या चाहत्यांना कायमच राहील यात शंका नाही.

श्रीदेवीचे कुटुंबियही तिच्या जाण्याच्या धक्क्यातून सावरु शकलेले नाहीत. त्यामुळेच की काय श्रीदेवीच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याचा निर्णय बोनी कपूर यांनी घेतला आहे. खरंतर श्रीदेवीच्या आयुष्यावर सिनेमे बनवायला अनेक निर्माते प्रयत्नशील आहेत. पण बोनी कपूर यांनी हा सिनेमा स्वत:च बनवायचं ठरवलं आहे. विशेष म्हणजे बोनी कपूर या सिनेमाच्या पटकथेचे कॉपीराईटही करून घेणार आहेत. त्यामुळे हा सिनेमा त्यांच्याशिवाय इतर कोणताही निर्मात बनवू शकणार नाही.

याशिवाय श्रीदेवी यांच्या आयुष्यावर पुस्तक लिहिण्यास अनेकजण उत्सुक आहेत. त्यामुळे योग्य वेळ आली की बोनी कपूर श्रीदेवी यांच्यावरील बायोपिक आणि पुस्तक या दोहोंची घोषणा करतील अशी चाहत्यांना प्रतिक्षा आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive