By  
on  

‘मिर्झापूर’ फेम अभिनेते शाहनवाज प्रधान यांचं निधन

हिंदी सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये विविध भूमिका साकारणारे  अभिनेते शाहनवाज प्रधान यांचं निधन झालं आहे. ५६ वर्षीय शाहनवाज यांनी हृदयविकाराचा धक्क्यामुळे ग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांनी मिर्झापूर वेब सीरिजमध्ये अभिनेता अली फजलच्या सासऱ्यांची भूमिका साकारली होती. म्हणजेच श्रिया पिळगावकरच्या वडिलांच्या भूमिकेत ते पाहायला मिळाले होते. 

शाहनवाज यांनी ‘जन से जनतंत्र तक’ या टीव्ही मालिकेतून पदार्पण केलं होतं. ‘श्री कृष्णा’ मालिकेत त्यांनी नंद बाबा यांची भूमिका साकारली होती. तर ‘अलिफ लैला’ मालिकेत सिंदबाद द सेलरची भूमिका त्यांनी साकारली होती. याशिवाय ते ‘ब्योमकेश बख्शी’, ‘तोता वेड्स मैना’, ‘बंधन सात जन्मों का’ आणि ‘सूट लाइफ ऑफ करण अँड कबीर’ या मालिकांमध्येही झळकले होते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive